‘या’ गुंतवणूक योजनांमुळे महिला ‘आत्मनिर्भर’ होतील, जाणून घ्या संपूर्ण माहिती |Best investment scheme for women to save money and tax in india

Best investment scheme for women to save money and tax in india

मित्रांनो आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. पण, नुकताच आलेल्या एका अहवालानुसार, देशातील 80 टक्के महिलांकडे आर्थिक साक्षरतेचा अभाव आहे. याचा अर्थ असा की महिला लोकसंख्येचा मोठा भाग आहे ज्यांना पैसा आणि कर वाचवण्याची फारशी समज नाही.

स्त्रियाही मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसाय करतात. अशा परिस्थितीत त्यांनी आर्थिक बाबींमध्येही अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. याआधी महिलांसाठी वेगळा टॅक्स स्लॅब होता आणि त्यांना पुरुषांपेक्षा जास्त सूट मिळत होती. पण, आता टॅक्स स्लॅबमध्ये लिंगाच्या आधारावर कोणतीही शिथिलता नाही. अशा परिस्थितीत आम्ही असे काही पर्याय सांगत आहोत ज्यात गुंतवणूक करून महिलांना चांगला परतावा (Best investment scheme for women to save money and tax in india) मिळू शकतो. जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा.

‘या’ गुंतवणूक योजनांमुळे महिला ‘आत्मनिर्भर’ होतील, जाणून घ्या संपूर्ण माहिती |Best investment scheme for women to save money and tax in india

महिला सन्मान बचत पत्र

 • महिला सन्मान बचत पत्र योजना विशेषतः महिलांसाठी आहे.
 • नोकरी करणाऱ्या, व्यावसायिक महिला आणि अल्पवयीन मुली पालकांच्या मदतीने गुंतवणूक करू शकतात.
 • FD सारखे काम करते.
 • गुंतवणूक 1000 रूपयेपासून, जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात.
 • व्याज दर 7.5%.
 • कर सूट नाही, पण व्याजावर कर नाही.
 • 50,000 गुंतवल्यास 2 वर्षात 58,011 मिळतील.
 • 1 लाख गुंतवल्यास 1,16,022 मिळतील.
 • 2 लाख गुंतवल्यास 2,32,044 मिळतील.
 • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा.
 • फक्त मार्च 2025 पर्यंत लाभ घेता येईल.

सुकन्या समृद्धी योजना

 • 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीची आई असल्यास लाभ घेता येईल.
 • पोस्ट ऑफिस किंवा बँकेत 250 मध्ये खाते उघडता येईल.
 • एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख जमा करता येतील.
 • करात सूट.
 • व्याज दर 8.2%.
 • दोन मुलींना लाभ.
 • जुळ्या किंवा त्यापेक्षा जास्त मुली लाभ मिळेल. (या योजनेचा लाभ दोन मुलींना मिळू शकतो. पण, जर कुटुंबात आधीच मुलगी असेल आणि त्यानंतर जुळ्या किंवा त्यापेक्षा जास्त मुली एकत्र जन्माला आल्या तर त्याही योजनेच्या लाभार्थी होऊ शकतात.
 • दत्तक मुलीसाठीही खाते उघडता येईल.

हे सुध्दा वाचा:- आता मुलीच्या शिक्षणाचे आणि लग्नाचे टेन्शन संपले, फक्त 121 रुपयाची गुंतवणूक करा

LIC ची आधारशिला पॉलिसी

 • महिलांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम योजना.
 • 8 वर्षांची मुलगी ते 55 वर्षांची महिला पॉलिसी घेऊ शकतात.
 • पॉलिसीची मुदत 10 ते 20 वर्षे.
 • कर्जाचा लाभ.
 • मॅच्युरिटीवर निश्चित रक्कम.
 • पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत.
 • नॉमिनीला 75,000 ते ₹3 लाख.
 • दररोज 87 गुंतवणूक करून मोठा परतावा.
 • 10 वर्षात 3,13,200 जमा.
 • 75 व्या वर्षी 11 लाखांपेक्षा जास्त मिळतील.

या योजनांमध्ये गुंतवणूक करून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतात आणि ‘आत्मनिर्भर’ बनू शकतात. तर मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा.

Telegram channelLink