मतदान कार्ड हरवलेय मग टेन्शन नका घेऊ, अश्या प्रकारे काढा डुप्लिकेट मतदान कार्ड | How to Apply and Get Duplicate Voter ID Card?

मित्रांनो मतदान कार्ड (Voter ID card) हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आहे. त्याच्या मदतीने भारतीय नागरिक निवडणुकीत मतदान करू शकतात. याशिवाय, हा एक महत्त्वाचा आयडी पुरावा देखील आहे. कोणताही नागरिक 18 वर्षांचा झाल्यावर तो मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतो. जर तुमचे मूळ मतदार ओळखपत्र हरवल्यास मतदान करता येणार नाही. जर तुमचे पण मूळ मतदार ओळखपत्र हरवले असेल तर तुम्ही डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरबसल्या डुप्लिकेट मतदार ओळखपत्र कस कधी शकता.

मतदान कार्ड हरवलेय मग टेन्शन नका घेऊ, अश्या प्रकारे काढा डुप्लिकेट मतदान कार्ड |How to Apply and Get Duplicate Voter ID Card?

डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

 • तुम्हाला तुमच्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या वेबसाइटवर जावे लागेल.
 • येथे तुम्ही फॉर्म EPIC-002 डाउनलोड करा.
 • यानंतर फॉर्म भरा आणि यामध्ये तुम्हाला एफआयआर, ॲड्रेस प्रूफ आणि कोणताही आयडी प्रूफ जोडावा लागेल.
 • आता तुम्हाला या फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे निवडणूक कार्यालयात जमा करावी लागणार आहेत.
 • फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक मिळेल.
 • तुम्ही संदर्भ क्रमांकाद्वारे स्थिती सहज तपासू शकता.
 • एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर निवडणूक कार्यालयाद्वारे प्रक्रिया आणि पडताळणी केली जाईल.
 • पडताळणीनंतर कार्यालय तुम्हाला कळवेल. यानंतर तुम्ही निवडणूक कार्यालयात जाऊन डुप्लिकेट मतदार ओळखपत्र मिळवू शकता.

हे सुध्दा वाचा:- Sovereign gold bond मध्ये गुंतवणूक का करावी, जाणून घ्या फायदे काय आहेत

यासाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

 • निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल.
 • यानंतर, दुसरे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म घ्यावा लागेल.
 • आता त्या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, पत्ता, मतदार ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल.
 • त्यानंतर फॉर्मसोबत कागदपत्रे जोडून जमा करावी लागतील.
 • या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर दुसरे ओळखपत्र दिले जाईल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.