मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने संबंधित संपूर्ण माहिती (Mukhyamantri apprenticeship yojana 2024)

मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Mukhyamantri apprenticeship yojana) ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवण्यास मदत करते. या योजनेचा मुख्य उद्देश दरवर्षी 10 लाख तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे. आज आपण काय आहे? पात्रता काय आहे? आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने संबंधित संपूर्ण माहिती (Mukhyamantri apprenticeship yojana 2024)

जॉईन व्हाट्सअप ग्रुप

या योजनेअंतर्गत 12वी पास झालेल्या तरूणांना दरमहा 6 हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

योजनेचे लाभ

 • दर महिन्याला 6,000 ते 10,000 रूपये पर्यंत विद्यावेतन.
 • विविध क्षेत्रात कुशल, अकुशल आणि सॉफ्ट स्किल प्रशिक्षण.
 • रोजगार मेळावा आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन.
 • विनामूल्य प्रशिक्षण आणि इतर सुविधा.

पात्रता काय आहे?

 • महाराष्ट्राचे रहिवासी असणे.
 • वय 18 ते 35 वर्षे.
 • किमान 10 वी उत्तीर्ण.
 • बेरोजगार असणे.

आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

 • आधार कार्ड
 • महाराष्ट्राचे रहिवास प्रमाणपत्र
 • शैक्षणिक पात्रतेचे दाखले (10 वी पास)
 • जात प्रमाणपत्र (जर आवश्यक असल्यास)
 • बेरोजगारी प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • बँक खाते पासबुक

अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

 • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
 • “ऑनलाइन अर्ज” बटणावर क्लिक करा.
 • आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि नोंदणी करा.
 • तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर आणि मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक OTP मिळेल.
 • OTP प्रविष्ट करा आणि तुमचे खाते सक्रिय करा.
 • लॉगिन करा आणि “अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
 • अर्ज फॉर्म पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • “जमा करा” बटणावर क्लिक करा.
 • तुमचा अर्ज क्रमांक आणि पावती डाउनलोड करा.

हे सुध्दा वाचा:- नारी शक्ती दूत ॲपद्वारे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

महत्वाची टीप:

 • अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरा.
 • आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करा.
 • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा.
 • तुम्ही जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाशी संपर्क साधूनही ऑफलाइन अर्ज करू शकता.
 • तुम्हाला अर्ज प्रक्रियेत मदत हवी असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 1800-233-7333 वर कॉल करू शकता.
GR downloadLink

मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा.

Telegram channelLink