आता इलेक्ट्रॉनिक स्वरूप मिळणार insurance policy आणि नॉमिनीची माहिती बंधनकारक, जाणून घ्या | Now the insurance policy and information of the nominee will be mandatory in electronic form

Now the insurance policy and information of the nominee will be mandatory in electronic form

मित्रांनो कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी जीवन विमा (insurance policy) हा महत्त्वाचा मार्ग आहे. विमा नियामक IRDAI पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियम बदलत असते. 2024-25 आर्थिक वर्षापासून विमा पॉलिसीशी संबंधित काही महत्त्वाचे बदल लागू होत आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते बदल केले आहेत.

आता इलेक्ट्रॉनिक स्वरूप मिळणार insurance policy आणि नॉमिनीची माहिती बंधनकारक, जाणून घ्या | Now the insurance policy and information of the nominee will be mandatory in electronic form

इलेक्ट्रॉनिक विमा पॉलिसी म्हणजे काय?

ई-विमा हे विमा उद्योगात होत असलेले एक क्रांतिकारी बदल आहे. यामध्ये विमा पॉलिसी कागदी स्वरूपात नसून डिजिटल स्वरूपात, म्हणजेच ई-पॉलिसी म्हणून जारी केल्या जातात.

डिजिटल विमा खाते

 • 1 एप्रिल 2024 पासून नवीन विमा पॉलिसी फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असतील.
 • विमा कंपनी प्रत्येक पॉलिसीधारकासाठी डिजिटल खाते उघडेल.
 • या खात्यात विमा पॉलिसी, बोनस आणि इतर संबंधित माहिती उपलब्ध असेल.
 • पॉलिसीधारकांना फिजिकल स्वरूपात (कागदी स्वरूपात) पॉलिसी मिळण्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल.
 • जुन्या पॉलिसी डिजिटल स्वरूपात रूपांतरित करता येतील.

नॉमिनीची माहिती बंधनकारक

 • 1 एप्रिलपासून नॉमिनी नसलेली नवीन जीवन विमा पॉलिसी जारी होणार नाही.
 • पॉलिसी जारी झाल्यानंतर नॉमिनी बदलण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
 • नॉमिनी बदलण्यासाठी कंपन्या ₹100 पर्यंत शुल्क आकारू शकतील.

रिफंड बँक खात्यात

 • आता विमा कंपन्या सर्व प्रकारचे रिफंड फक्त पॉलिसीधारकाच्या बँक खात्यात देतील.
 • विमा कंपन्यांना पॉलिसी विकताना बँक खात्याची माहिती घेणे बंधनकारक असेल.

हे सुध्दा वाचा:- विमा सुगम इन्शुरन्स म्हणजे काय? आणि त्याचे फायदे काय? संपूर्ण माहिती जाणून घ्या

या बदलांचे आपल्याला काय फायदे आहेत

 • पॉलिसीधारकांना पॉलिसी आणि इतर माहिती सहज उपलब्ध होईल.
 • कागदपत्रांचा गैरवापर टाळण्यास मदत होईल.
 • पॉलिसी व्यवहार अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होतील.
 • पॉलिसीधारकांनी या बदलांची नोंद घेऊन आवश्यक ती पूर्तता करणे आवश्यक आहे.

टीप: हे बदल 1 एप्रिल 2024 पासून लागू होत आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या विमा कंपनीशी संपर्क साधा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.