16व्या हप्त्याचे पैसे अजून तुमच्या खात्यात आले नाहीत? जाणून घ्या काय कारण आहे | Pm kisan yojana pm kisan 16th installment not received status

मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM KISAN YOJANA) चा 16 वा हप्ता जारी केला. देशातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम पोहोचली आहे.

पण अद्यापही अनेक शेतकऱ्यांना योजनेची रक्कम अजून मिळालेली नाही. योजनेची रक्कम अजून तुमच्या खात्यात आली नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला हा लाभ का मिळाला नाही आणि त्याबद्दल तुम्हाला कुठे तक्रार करावी लागेल हे आज आपण जाणून घेणार आहोत.

16व्या हप्त्याचे पैसे अजून तुमच्या खात्यात आले नाहीत? जाणून घ्या काय कारण आहे | Pm kisan yojana pm kisan 16th installment not received status

कुठे तक्रार करायची?

जर तुम्ही PM किसान योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही पात्र शेतकरी असाल तर PM किसान योजनेचा 16 वा हप्ता तुमच्या खात्यात आला असता. योजनेची रक्कम अजून आली नसेल तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही पीएम किसान हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता.

तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 आणि 155261 किंवा टोल फ्री क्रमांक 18001155266 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही pmkisan-ict@gov.in आणि pmkisan-funds@gov.in वर ईमेल करून तक्रार करू शकता.

हप्ता का आला नसेल?

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही त्यांना 16 वा हप्ता मिळणार नाही. केंद्र सरकारने ई-केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. याशिवाय सरकार फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची नावेही लाभार्थी यादीतून काढून टाकत आहे.

हे सुध्दा वाचा:- फक्त याचं शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan yojana चा 16वा हफ्ता, जाणून घ्या काय भानगड आहे

तक्रार करण्यापूर्वी लाभार्थ्यांची यादी तपासा

PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात आली नसेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव एकदा तपासावे.

  • पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या (pmkisan.gov.in)
  • आता ‘Farmer Corner’ वर जा आणि ‘Beneficiary Status’ निवडा
  • यानंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायत अशी उर्वरित माहिती निवडा
  • नंतर आता तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका
  • यानंतर Get Data निवडा.
  • आता तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत तपासावे लागेल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.