तुम्हीही गुंतवणूक सुरू करत असाल तर आधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा | 5 Things You Should Do Before Investing Money

मित्रांनो आजकाल गुंतवणूक करणे खूप महत्वाचे झाले आहे. आपण आपल्या पहिल्या पगारापासूनच गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. गुंतवणुकीमुळे आपले उत्पन्नाचे स्रोत वाढण्यास मदत होते. जर तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर असे करण्यापूर्वी काही गोष्टी काळजी तुम्ही घेतली पाहिजे.जर काळजी नाही घेतल्यास भविष्यात तुम्हाला मोठा धोका पत्करावा लागू शकतो. गुंतवणुकीपूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आज आपण जाणून घेऊया.

तुम्हीही गुंतवणूक सुरू करत असाल तर आधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा | 5 Things You Should Do Before Investing Money

पहिले गुंतवणुकीबद्दल जाणून घ्या

मित्रांनो तुम्हाला जोखीम घेऊन गुंतवणूक करायची आहे? का की जोखीम न घेता. सर्वात पहिले आपण ही गोष्ट समजुन घेतली पाहिजे. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा डेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या ठिकाणी तुमचे थोड्या प्रमाणात का होईना नुकसान होऊ शकते. कारण जर तुम्हाला त्याबद्दल काही नॉलेज नसेल आणि तुम्ही त्यात पैसे गुंतवत असाल तर हे तुमच्यासाठी फायदेशीर राहणार नाही. अशा स्थितीत तुमच्यासाठी गुंतवणुकीचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत योग्य संशोधन करणे कधी पण चांगल. अनेक वेळा घाईघाईने आपण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो.

नेहमी गुंतवणूक करत रहा

गुंतवणुकीचे स्रोत वाढवण्याबरोबरच आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यातही मदत होते. अशा परिस्थितीत तुम्ही कधीही गुंतवणूक करणे थांबवू नये. जर आपण नियमित गुंतवणूक केली तर ते आपल्या आपत्कालीन परिस्थितीतही आपल्याला मदत करते. याशिवाय गुंतवणुकीचे अनेक पर्याय सेवानिवृत्तीनंतरही उत्पन्न चालू ठेवण्यास मदत करतात.

सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका

सोशल मीडियावर अनेकजण गुंतवणुकीचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत बरेचदा लोक त्यांचा सल्ला घेतात आणि गुंतवणूक करतात. ज्यामुळे त्यांना एकतर कमी परतावा मिळतो किंवा ते गुंतवणूकीची रक्कम गमावून बसतात. या कारणास्तव, तुम्ही नेहमी गुंतवणुकीसाठी विश्वासू सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नका

आपण कधीही फक्त एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नये. आपण आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली पाहिजे. जर आपण एकाच ठिकाणी गुंतवणूक केली तर आपल्याला कमी परतावा मिळू शकतो. जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करावी. होय, हे लक्षात ठेवा की घाईत गुंतवणूक करू नका.

हे सुध्दा वाचा:- निवृत्तीनंतर या योजनेत मिळेल तुम्हाला पेन्शनचा लाभ, जाणून घ्या नोंदणी कशी करावी?

मित्रांनो अजून काही गोष्टी आहेत ज्या आपण गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घेतल्या पाहिजे.

तुमचे ध्येय काय आहे हे जाणून घेतल पाहिजे?

मित्रांनो दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा, मुलांचे शिक्षण, निवृत्तीची नियोजन किंवा इतर काही गोष्टींसाठी तुम्ही गुंतवणूक करत आहात का किंवा तुमचे ध्येय स्पष्ट असल्यास, तुम्ही तुमच्या गुंतवणूक योजनेची रचना करू शकता.

तुमचा जोखिम सहनशीलता किती आहे?

मित्रांनो काही गुंतवणूक अधिक जोखीम असतात परंतु उच्च परतावा देऊ शकतात, तर काही कमी जोखीम असतात परंतु कमी परतावा देऊ शकतात. तुमच्या जोखिम सहनशीलतेनुसार तुम्ही गुंतवणूक निवडणे आवश्यक आहे.

तुमचा गुंतवणूक कालावधी काय आहे?

दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने तुम्हाला बाजारपेठेच्या चढउतारांना सामोरे जावे लागते आणि तुमच्या गुंतवणूक वाढण्याची अधिक शक्यता असते. तुमच्या गुंतवणूक कालावधीनुसार तुम्ही गुंतवणूक निवडणे आवश्यक आहे.

तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे?

तुमचे उत्पन्न, कर्ज आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या तुमच्या गुंतवणूक निर्णयांवर परिणाम करतात. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा

मित्रांनो गुंतवणूक ही लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग नाही. दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने चांगले परतावा मिळण्याची जास्त शक्यता असते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.