अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार दरमहा 5000 रुपये पेन्शन, योजनेचे काय फायदे आहेत? |Atal pension yojana benefits in marathi

मित्रांनो व्यावसायिक असो किंवा नोकरी करणारे निवृत्तीनंतरही आपले उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी नेहमी बचत करत असतात. बचतीसाठी अनेक लोक बँकेत पैसे जमा करतात किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करतात. बचतीवर परतावा मिळवण्यासाठी आज अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. ज्या आपल्याला माहीत नाही.

अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार दरमहा 5000 रुपये पेन्शन, योजनेचे काय फायदे आहेत? |Atal pension yojana benefits in marathi

बचत वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनाही (Atal pension yojana benefits) सुरू केली. या योजनेत, गुंतवणूकदाराला मुदतपूर्तीनंतर दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळतो. भारत सरकारने 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतात. गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या रकमेवर सरकारकडून परतावा दिला जातो. या योजनेची मॅच्युरिटी झाल्यानंतर, गुंतवणूकदाराला दरमहा 5,000 रुपयांपर्यंत पेन्शनचा लाभ दिला जातो.

या योजनेअंतर्गत तुम्हाला किती परतावा मिळतो?

या योजनेत दर महिन्याला 210 रुपये गुंतवल्यास वयाच्या 69 वर्षांनंतर लाभ मिळेल. याचा अर्थ गुंतवणूकदाराला 60 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागते. 60 वर्षांनंतर, गुंतवणूकदाराला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळते. योजनेत गुंतवलेली रक्कम वयानुसार कमी होते. गुंतवणूकदार जेवढी गुंतवणूक करतो तेवढीच पेन्शन त्याला मिळते.

अटल पेन्शनसाठी अर्ज कसा भरावा?

  • या योजनेसाठी तुम्ही बँकेत जाऊन ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अटल पेन्शन योजनेच्या पोर्टलवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
  • यानंतर, हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन तो फॉर्म जमा करावा लागेल.
  • फॉर्मसोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स जमा करावी लागेल.
  • याशिवाय तुमचा मोबाईल नंबर बँक खाते आणि आधार कार्डशी जोडलेला असावा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.