बँक ग्राहकांनो कृपया लक्ष द्या! Home आणि personal लोन घेणे आता महाग झाले? जाणून घ्या काय आहेत रेट ऑफ इंटरेस्ट |Banks revised marginal cost of fund based lending rate check list

मित्रांनो या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीपासून अनेक बँकांनी त्याच्या कर्जाच्या दरांमध्ये बदल केले आहेत. अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम गृह( home) आणि वैयक्तिक (personal ) कर्जावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दोन्ही कर्जे आता ग्राहकांसाठी महाग झाली आहेत. एकूण 7 बँकांनी त्यांच्या किरकोळ किमतीच्या कर्ज दरांबाबत नवीनतम अपडेट शेअर केले आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे नवीन रेट ऑफ इंटरेस्ट(New rate of interest )

बँक ग्राहकांनो कृपया लक्ष द्या! Home आणि personal लोन घेणे आता महाग झाले? जाणून घ्या काय आहेत रेट ऑफ इंटरेस्ट |Banks revised marginal cost of fund based lending rate check list

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेने MCLR दर 5 बेसिस पॉइंटने वाढवले आहेत. नवीन अपडेटनुसार दर हे आता 8.2 वरून 8.25 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

महिने/वर्षजुने व्याजदरनवीन व्याजदर
3 महिने 8.35 %8.40%
6 महिने8.55%8.60%
1 वर्ष8.65%8.70%

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियानेही MCLR दर 5 बेसिस पॉइंटने वाढवले आहेत. नवीन अपडेटनुसार 7.95 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

महिने/वर्षनवीन व्याजदर
3 महिने8.40 %
6 महिने8.60%
1 वर्ष8.80%

एचडीएफसी बँक

HDFC बँकेने MCLR दर 10 बेसिस पॉईंटने वाढवले आहेत. नवीन अपडेटनुसार दर 8.70 टक्क्यांवरून 8.80 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

महिने/वर्षनवीन व्याजदर
3 महिने9%
6 महिने9.20%
1 वर्ष9.25%

आयसीआयसीआय बँक

ICICI बँकेने MCLR दर 10 बेसिस पॉईंटने वाढवले आहेत. नवीन अपडेटनुसार दर 8.50 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

महिने/वर्षजुने व्याजदरनवीन व्याजदर
3 महिने8.55 %8.65%
6 महिने8.90%9.0%
1 वर्ष9%9.10%

कॅनरा बँक

कॅनरा बँकेने MCLR दर 5 बेसिस पॉईंटने वाढवले आहेत. नवीन अपडेटनुसार 8 टक्क्यांवरून 8.05 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

महिने/वर्षजुने व्याजदरनवीन व्याजदर
3 महिने8.20 %8.25%
6 महिने8.55%8.60%
1 वर्ष8.75%8.80%

IDBI बँक

IDBI बँकेने MCLR दर वाढवले आहेत. नवीन अपडेटनुसार 8.30 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

महिने/वर्षनवीन व्याजदर
3 महिने8.75 %
6 महिने8.95%
1 वर्ष9%

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदाने MCLR दर 5 बेसिस पॉइंटने वाढवले आहेत. नवीन अपडेटनुसार दर 8 टक्क्यांवरून 8.05 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

महिने/वर्षनवीन व्याजदर
3 महिने8.40 %
6 महिने8.60%
1 वर्ष8.80%

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.