मित्रांनो मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि तिच्या शिक्षणाचा विचार करून सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) सुरू केली. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर हमी व्याज उपलब्ध आहे. यावर सरकार चक्रवाढ व्याज देते. या योजनेत, आई वडील किंवा पाल्य 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात. या पॉलिसीची मॅच्युरिटी ही 21 वर्षानंतर होते. यामध्ये फक्त 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. सध्या या योजनेत सरकार 8 टक्के व्याज देते.
या योजनेत तुम्ही किमान 250 रुपये गुंतवू शकता, म्हणजेच तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. आज आपण जाणून घेणार आहोत की, sukanya samriddhi account online कस चेक करायचं.
सुकन्या समृद्धी योजनेत तुमच्या मुलीच्या नावावर किती पैसे जमा झालेत आता घर बसल्या चेक करा?|How can I check my Sukanya samriddhi balance online?
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? | sukanya samriddhi yojana apply online
- तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या वेबसाइटवरून सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो, मुलाचा जन्म दाखला, पालकांचा ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे जोडावी लागतील.
- यानंतर, कागदपत्रांसह फॉर्म जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करा.
- फॉर्म आणि मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर कर्मचारी मुलीच्या नावाने खाते उघडेल.
- यानंतर तुम्ही मुलीच्या खात्यात गुंतवणूक करू शकता.
अशा प्रकारे तुम्ही खात्यातील रक्कम तपासू शकता?
- सुकन्या समृद्धी योजनेची शिल्लक रक्कम (sukanya samriddhi account) ऑनलाइन तपासण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंगची सुविधा चालु करावी लागेल.
- तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
- यानंतर, तुम्हाला डॅशबोर्डवर सर्व खात्यांचे क्रमांक दिसतील.
- आता स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसत असलेल्या अकाउंट स्टेटमेंटचा पर्याय निवडा.
- यानंतर, सर्व खात्यांच्या सूचीमधून सुकन्या खाते क्रमांकावर क्लिक करावं लागेल. आता तुमची शिल्लक स्क्रीनवर दिसेल.
ही सुकन्या खाती 21 मार्च रोजी बंद होणार
सुकन्या खात्यात किमान गुंतवणुकीची रक्कम वर्षभरात जमा न केल्यास खाते होल्ड केले जाऊ शकते. 31 मार्चपर्यंत ज्या खात्यांमध्ये किमान रक्कम दरवर्षी जमा होत नाही ती सर्व खाती निष्क्रिय होतील. खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला दंड सुध्दा भरावा लागेल.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.