फक्त याचं शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan yojana चा 16वा हफ्ता, जाणून घ्या काय भानगड आहे |PM-Kisan 16th instalment, Complete eKYC to receive payment; know how here

मित्रांनो 2019 मध्ये सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. सरकारने 15 नोव्हेंबर 2023 रोजी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 15 वा हप्ता जारी केला होता. पीएम किसान योजनेतून वर्षाला 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 2,000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC (PM Kisan Ekyc) करणे आवश्यक आहे.

मित्रांनो सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसानच्या नावावर अनेक प्रकारची फसवणूक होत होती. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले होते. सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करू शकता. चला तर जाणून घेऊया ई-केवायसीच्या प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती?

फक्त याचं शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan yojana चा 16वा हफ्ता, जाणून घ्या काय भानगड आहे

ई-केवायसी कसे करावे?

  • तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर http://pmkisan.gov.in जावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला Farmer Corner वर क्लिक करावे लागेल.
  • आता खाली दिलेल्या ड्रॉपडाऊनवर e-KYC चा पर्याय निवडा.
  • तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
  • ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

हे सुध्दा वाचा:- Mahila Samman Savings Certificate गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा नाही, जाणून घ्या संपूर्ण माहिती

अशा प्रकारे ई-केवायसीही करता येते?

  • तुम्ही ऑफलाइनही ई-केवायसी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. येथे तुम्ही बायोमेट्रिक केवायसी (Biometric e kyc) करून घेऊ शकता.
  • आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर तुम्ही स्वतः ई-केवायसी ऑनलाइन केले तर तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्याच वेळी, कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला फी भरावी लागेल. मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची आहे तर नक्की शेअर करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.