सोमवारपासून उपलब्ध होतील सॉव्हरिन गोल्ड बाँड, जाणून घ्या किंमत काय आहे? | Sovereign Gold Bonds 2023-24 Series IV to open on Feb 12

मित्रांनो सॉव्हरिन गोल्ड बाँड (SGB) सोमवारपासून 5 दिवसांसाठी खुले होणार आहेत. गोल्ड बाँडच्या या हप्त्याची इश्यू किंमत ही जवळपास 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना दर्शनी मूल्यावर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सोमवारपासून उपलब्ध होतील सॉव्हरिन गोल्ड बाँड, जाणून घ्या किंमत काय आहे? | Sovereign Gold Bonds 2023-24 Series IV to open on Feb 12

गोल्ड बाँडची इश्यू किंमत 6,213 रुपये असणार आहे

मित्रांनो गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 6,213 रुपये असेल असे आरबीआयने म्हटले आहे. SGBs अनुसूचित व्यावसायिक बँका (स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), सेटलमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), नियुक्त पोस्ट ऑफिसेस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड. यांच्यामार्फत विक्री केली जाणार आहे.

हे सुध्दा वाचा:- Sovereign gold bond मध्ये गुंतवणूक का करावी, जाणून घ्या फायदे काय आहेत

दर वेळेस केंद्रीय बँक सुवर्ण रोखे जारी करते

केंद्रीय बँक खरेतर भारत सरकारच्या वतीने सुवर्ण रोखे जारी करते. हे फक्त निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जाऊ शकतात. वर्गणीची कमाल मर्यादा व्यक्तींसाठी चार किलोग्रॅम, एचयूएफसाठी चार किलोग्रॅम आणि ट्रस्ट आणि तत्सम संस्थांसाठी 20 किलोग्रॅम प्रति आर्थिक वर्ष आहे. सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याच्या उद्देशाने गोल्ड बॉण्ड योजना नोव्हेंबर 2015 मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती. तर मित्रांनी तुम्ही पण यामध्ये गुंतवणूक करणार आहात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

हे सुध्दा वाचा:- प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय? आणि त्यांचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.