तुम्ही पण फिरायला चालला आहात का! मग Travel insurance बद्दल माहित असणे आवश्यक आहे? |Travel insurance information in marathi

मित्रांनो नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक जण शहराबाहेर फिरायला जातात. जर तुम्ही देखील शिमला किंवा गोव्याला मित्र किंवा कुटुंबासह जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. मित्रांनो कधी पण लांब फिरायला जाण्याच्या आधी प्रवास विमा (Travel insurance) घेणे गरजेचे आहे. हे तुमच्या सुरक्षिततेसाठी तसेच तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचे आहे. आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत की, प्रवास विमा इतका महत्त्वाचा का आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला प्रवास करताना होणाऱ्या अपघातांपासून वाचवतो. यात मोठ्या प्रमाणात जोखीम समाविष्ट आहेत. याशिवाय अनेक प्रकारच्या सुविधाही यामध्ये देण्यात आल्या आहेत. चला तर जाणून घेऊया Travel insurance information in marathi बद्दल सविस्तरपणे.

तुम्ही पण फिरायला चालला आहात का! मग Travel insurance बद्दल माहित असणे आवश्यक आहे? |Travel insurance information in marathi

प्रवास विम्याचे फायदे काय आहेत? | Travel insurance benefits in marathi

  • मित्रांनो प्रवासादरम्यान अचानक तब्येत बिघडली तर अशा परिस्थितीत प्रवास विमा खूप उपयुक्त ठरू शकतो. यामध्ये रुग्णालयाची बिले, रुग्णवाहिकेचे शुल्क आदी खर्चचा समाविष्ट आहेत.
  • जर तुम्ही प्रवास विमा घेतला असेल आणि प्रवास करताना तुमचे सामान चोरीला गेले, तरीही तुम्हाला सामानाची भरपाई मिळेल. पासपोर्ट किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेल्यासही खूप मदत होते.
  • या विम्याचा फायदा असा आहे की तुम्ही कधीही कनेक्टिंग फ्लाइट चुकवल्यास, तुम्हाला त्यासाठी कव्हरेज देखील दिले जाते. फ्लाइटच्या खर्चासाठी तुम्ही सहजपणे नुकसानीचा दावा करू शकता.
  • अनेक वेळा परदेशात किंवा प्रवासात असताना आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवते. अशा परिस्थितीतही प्रवास विमा खूप उपयुक्त ठरतो. विम्याच्या मदतीने तुम्ही सहज तक्रार करू शकता.
  • प्रवासादरम्यान काही दुर्घटना घडल्यास विम्याच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळते. यामध्ये अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व देखील समाविष्ट आहे.

हे सुध्दा वाचा:- दर वेळी आरोग्य विम्याचा हप्ता वाढत चाललाय, मग ‘या’ टिप्स तुमच्यासाठी

Insurance घेतांना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • जेव्हा तुम्ही प्रवास विमा घेता तेव्हा तुम्ही योजना काळजीपूर्वक निवडावी.
  • तुम्ही विम्याच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • कोणत्या तरी भरोशाच्या कंपनीकडूनच विमा घ्या.
  • विम्याच्या प्रीमियमबाबत, तुम्ही इतर कंपन्यांच्या प्रीमियमची तुलना केली पाहिजे.
  • कंपनीने दिलेल्या सुविधांबद्दल सविस्तरपणे माहिती घ्यावी.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.