आता पेन्शनची सर्व माहिती घर बसल्या मिळवू शकता, जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म 16 सुध्दा सबमिट करू शकाल | What is bhavishya portal and its benefits in marathi online

मित्रांनो पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनचा हिशोब ठेवण्यासाठी अनेकदा अडचणी येतात. अनेक वेळा काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे पेन्शन बंद होते, त्यामुळे त्यांना बरीच धावपळ करावी लागते. याचं समस्या सोलुशन म्हणून, केंद्र सरकारचे भविष्य पोर्टल लाँच केलं आहे.

भविष्य पोर्टलच्या मदतीने पेन्शनधारक त्यांची मासिक पेन्शन स्लिप घरी बसून तपासू शकतात. त्यांना थकबाकी बाबतही माहिती मिळणार आहे. ते येथून त्यांच्या जीवन प्रमाणपत्राची स्थिती देखील तपासू शकतात. त्याचबरोबर तुम्ही फॉर्म-16 देखील सबमिट करू शकता (What is bhavishya portal and its benefits in marathi online).

आता पेन्शनची सर्व माहिती घर बसल्या मिळवू शकता, जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म 16 सुध्दा सबमिट करू शकाल | What is bhavishya portal and its benefits in marathi online

बँक ऑफ इंडियासह सरकारी पुढाकार

केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने भविष्य पोर्टल सुरू केले आहे. तसेच, पेन्शनर्स बँक ऑफ इंडिया, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेच्या बँक खात्यांमध्ये पेन्शन असलेले लोक भविष्य पोर्टल वापरू शकतात. भविष्यात सर्व बँका भविष्य पोर्टलशी जोडण्याचा सरकारचा विचार आहे.

भविष्य पोर्टलचा उद्देश काय आहे?

भविष्य पोर्टलचा उद्देश पेन्शनशी संबंधित सर्व कामे डिजिटल करणे हा आहे. यामुळे पेन्शन सुरू करण्यापासून पेमेंटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होईल. निवृत्तीवेतनधारक त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे भविष्य पोर्टलवर ऑनलाइन सबमिट करू शकतात. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पेन्शनच्या स्थितीची माहिती मोबाईल किंवा ईमेलद्वारे मिळणार आहे.

हे सुध्दा वाचा:- NPS नियमांमध्ये बदल: तुमच्या खात्यावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या!

भविष्य पोर्टलचे हे फायदे काय आहेत?

  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल.
  • पेन्शन फंडाच्या उर्वरित रकमेची माहिती त्वरित उपलब्ध होईल.
  • पेन्शन स्लिप, फॉर्म-16, जीवन प्रमाणपत्राची स्थिती तपासण्यास सक्षम असेल.

पोर्टलद्वारे तुम्ही पेन्शन भरणारी बँक देखील बदलू शकता.

पोर्टलवर नोंदणी कशी करता येईल?

  • यासाठी तुम्हाला अधिकृत साइटवर जावं लागेल (https://bhavishya.nic.in/).
  • मुख्यपृष्ठावर नोंदणी पर्याय दिसेल
  • क्लिक केल्यावर नोंदणी फॉर्म उघडेल.
  • यामध्ये नाव, जन्मतारीख, सेवानिवृत्तीची तारीख, मंत्रालय, विभाग आदी माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • शेवटी तुम्हाला सिक्युरिटी कार्ड टाकावे लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.

या प्रोसेसमध्ये तुम्हाला आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती, पासपोर्ट आकार फोटो, ईमेल आयडी आणि पॅन कार्ड यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.

मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा.

Telegram channelLink