विमा सुगम इन्शुरन्स म्हणजे काय? आणि त्याचे फायदे काय? संपूर्ण माहिती जाणून घ्या | What is bima sugam insurance and benefits in marathi

मित्रांनो आपण अनेक इन्शुरन्स बद्दल ऐकलं आहे पण नेमकं हे ‘विमा सुगम इन्शुरन्स (Bima Sugam Insurance) नेमकी काय भानगड आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

विमा सुगम इन्शुरन्स हे IRDAI ने जारी केलेला ड्राफ्ट आहे जो 23 फेब्रुवारी 2024 रोजी लॉज करण्यात आला. IRDAI ने ही योजना 2023 मध्ये लॉन्च केली होती ही योजना लवकरच जून महिन्यापर्यंत लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे. चला तर जाणून घेऊया Bima Sugam Insurance benefits in Marathi बद्दल माहिती.

विमा सुगम इन्शुरन्स म्हणजे काय? आणि त्याचे फायदे काय? संपूर्ण माहिती जाणून घ्या

विमा सुगम म्हणजे काय? | What is Bima Sugam in marathi?

मित्रांनो विमा सुगम ही एक ऑनलाइन इन्शुरन्स मार्केटप्लेस आहे. त्याचा अर्थ असा आहे की, ज्याप्रमाणे आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स पोर्टलवरून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो, त्याचप्रमाणे बीमा सुगम पोर्टलवरून आपण विविध विमा कंपन्यांचे विमा पर्याय पाहू आणि त्यांची तुलना एकमेकांशी करू शकतो.

विमा सुगम मध्ये कोणत्या प्रकारचे विमा उपलब्ध आहेत? (What types of insurance are available in Bima Sugam?)

विमा सुगम पोर्टलवर जीवन विमा, आरोग्य विमा आणि सर्वसाधारण विमा (जसे की वाहन विमा (vehicle insurance) आणि प्रवासी विमा (travel insurance) असे सर्व प्रकारचे विमा उपलब्ध असतील.

विमा सुगमचे फायदे काय आहेत? (What are the benefits of Bima Sugam?)

पर्याय आणि तुलना करणे सोपे जाईल (Easy to compare and choose):

विविध विमा कंपन्यांचे पर्याय एकाच ठिकाणी पाहता येऊ शकतात, त्यामुळे आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार सर्वोत्तम विमा योजना निवडणे सोपे होते.

कागदपत्रांची कमी गरज लागेल (Less paperwork):

विमा दावे सोप्या पद्धतीने आणि कमी कागदपत्रांच्या आधारे केले जाणार आहेत.

हे सुध्दा वाचा:- सगळ्यांत चांगला जीवन विमा घ्यायचा असेल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

पारदर्शकता पण राहील (Transparency):

विमा कंपन्यांना त्यांच्या योजनांची माहिती स्पष्टपणे देण्याची आवश्यकता असेल, त्यामुळे ग्राहकांना अधिक माहिती मिळेल आणि योग्य निर्णय घेता येईल.

कमी खर्च सुध्दा लागेल (Lower costs):

विमा सुगाममुळे विमा कंपन्यांच्या खर्चात बचत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांना स्वस्त विमा मिळण्याची शक्यता आहे.

विमा सुगम कधी लाँच होईल? (When will Bima Sugam launch?)

विमा सुगाम अद्याप लॉन्च झालेले नाही, परंतु IRDAI च्या म्हणण्यानुसार, ते 2024 च्या जूनमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

महत्वाची टीप: विमा सुगाम अजूनही विकासाधीन असल्याने, माहितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अधिकृत माहितीसाठी, कृपया IRDAIच्या वेबसाइट: https://www.irdai.gov.in/ ला भेट द्या.