ईएमआय कार्ड म्हणजे काय? आपल्याला त्याचा फायदा कुठे कुठे होऊ शकतो? जाणून घ्या | What is emi card know know emi card advantages here in Marathi

मित्रांनो जर तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल किंवा DSLR कॅमेरा घ्यायचा असेल तर तुम्ही EMI कार्ड देखील वापरू शकता. हे कार्ड क्रेडिट कार्ड (Credit card) आणि डेबिट कार्डपेक्षा बरेच वेगळे आहे. सध्या अनेक बँका ग्राहकांना ईएमआय कार्ड सुविधा देत आहे. आज आपण याचं ईएमआय कार्ड बद्दल जाणून घेणार आहोत. अर्थात हे कार्ड काय आहे आणि त्यात ग्राहकाला कसा फायदा आहे हे जाणून घेणार आहोत.

ईएमआय कार्ड म्हणजे काय? आपल्याला त्याचा फायदा कुठे कुठे होऊ शकतो? जाणून घ्या | What is emi card know know emi card advantages here in Marathi

हे EMI Card काय आहे?

मित्रांनो आपल्याला कधीही पैशांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड देखील खूप उपयोगी पडते. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही ते अगदी आपत्कालीन परिस्थितीतही वापरू शकता. अनेक बँका आणि क्रेडिट कंपन्या क्रेडिट कार्डवर व्याज आकारतात. अशा परिस्थितीत व्याज भरण्याच्या भीतीने लोक त्याचा वापर करत नाहीत.

देशातील अनेक बँका आता ग्राहकांना ईएमआय कार्डचा लाभही देत आहेत. हे कार्ड क्रेडिट कार्डप्रमाणेच काम करते. पण यावर कोणत्याही प्रकारची व्याज आकारले जात नाही. या कार्डद्वारे तुम्ही कधीही कुठेही पेमेंट करू शकता. या कार्डद्वारे खरेदी, बिल भरणे आदी कामे करता येतात. याशिवाय कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स असे अनेक अतिरिक्त फायदे या कार्डमध्ये दिले आहेत.

हे सुध्दा वाचा:- तुम्हीही PPF मध्येही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला 1% व्याजाने कर्ज मिळेल

या EMI कार्डचे फायदे काय आहेत?

  • या कार्डद्वारे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने शॉपिंग करू शकता.
  • या कार्डवर केलेल्या खरेदीवर तुम्ही नो कॉस्ट EMI चा लाभ देखील घेऊ शकता.
  • तुम्ही या कार्डद्वारे ऑनलाइन शॉपिंग केल्यास तुम्हाला झिरो डाउन पेमेंट आणि फ्री होम डिलिव्हरी असे अनेक फायदे मिळू शकतात.
  • EMI कार्डवर कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स देखील उपलब्ध आहेत.
  • ईएमआय कार्डवर तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम भरण्याची गरज नाही.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.