ग्रॅच्युइटीच कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? यासाठी किती वर्षांची सेवा आवश्यक आहे? | What is gratuity and how to calculate gratuity in marathi

मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने अनेक तरतुदी केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे ग्रॅच्युइटी(Gratuity). कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) प्रमाणे, ग्रॅच्युइटी देखील कर्मचारी आणि कंपनीद्वारे योगदान दिले जाते. परंतु, ईपीएफच्या विपरीत, येथे कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक छोटासा भाग कापला (What is gratuity and how to calculate gratuity in marathi) जातो आणि यामुळे कंपनीला मोठा भार सहन करावा लागतो. ग्रॅच्युइटी म्हणजे काय, ती कधी मिळते आणि ती कशी मोजली जाते हे सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

ग्रॅच्युइटीच कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? यासाठी किती वर्षांची सेवा आवश्यक आहे? | What is gratuity and how to calculate gratuity in marathi

ग्रॅच्युइटी म्हणजे काय?

मित्रांनो ग्रॅच्युइटी हा कंपनीकडून निष्ठेसाठी दिलेला एक प्रकारचा पुरस्कार आहे. जर तुम्ही एकाच कंपनीत 5 किंवा अधिक वर्षे सतत काम करत असाल तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळू शकते. पण 5 वर्षांचा सेवा कालावधी कमी करून एक वर्ष करण्याची चर्चा आहे. केंद्राच्या नवीन वेतन संहितेत याची चर्चा करण्यात आली आहे आणि ती लागू झाल्यानंतर कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

ग्रॅच्युइटी कधी मिळते?

ग्रॅच्युइटी सहसा निवृत्तीनंतर मिळते. परंतु, जर तुम्ही 5 वर्षांनी तुमची नोकरी सोडली किंवा बदलली, तरीही तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळेल. सेवेदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा तो अपंग झाल्यास 5 वर्षांपेक्षा कमी सेवा असतानाही ग्रॅच्युइटी मिळते.

तुमच्या नोकरीदरम्यान तुम्ही संस्थेच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान केले असेल, तर त्याची भरपाई तुमच्या ग्रॅच्युइटी मधून केली जाऊ शकते.

ग्रॅच्युइटीच कॅल्क्युलेशन कसं केलं जातं?

मित्रांनो ग्रॅच्युइटीची गणना करण्याचे सूत्र खूप सोपे आहे,

एकूण ग्रॅच्युइटी = (अंतिम मूळ मासिक वेतन) x (20/26) x (सेवेची वर्षे).

मित्रांनो या गोष्टी एक उदाहरण घेऊन समजून घेऊया.

तुम्ही तुमची नोकरी 2018 मध्ये सुरू केली आणि 2024 मध्ये राजीनामा दिला. राजीनाम्याच्या वेळी तुमचे मूळ मासिक वेतन 60 हजार रुपये होते. त्यामुळे तुमची ग्रॅच्युइटीची रक्कम अशा प्रकारे कळेल.

60000 x (20/26) x 5 = 156000

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे ती म्हणजे, फेब्रुवारी महिना वगळता वर्षातील इतर सर्व महिने हे 30 किंवा 31 दिवसांचे असतात. परंतु, पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 अंतर्गत चार साप्ताहिक सुट्ट्यांसह कामकाजाचे दिवस हे 26 दिवस निश्चित करण्यात आले आहेत.

हे सुध्दा वाचा:- EPF, PPF आणि GPF खात्यांमध्ये काय फरक आहे? फायदे आहेत, जाणून घ्या

कंपनीने ग्रॅच्युइटी न दिल्यास काय करावे?

जर तुम्ही एखाद्या संस्थेत सतत 5 वर्षे काम केले असेल आणि तुमच्यावर कोणतेही बेकायदेशीर काम केल्याचा आरोप नसेल, तर तुम्हाला ग्रॅच्युइटीची संपूर्ण रक्कम मिळेल. कंपनीने तुमचे पैसे रोखले असेल तर तुम्ही जिल्हा कामगार आयुक्तांकडे जाऊन तक्रार करू शकता. निर्णय तुमच्या बाजूने आल्यास, कंपनीला दंड आणि व्याजासह ग्रॅच्युइटी भरावी लागेल.

Note:- गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.