पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे काय? EPFO कडून पेन्शन घेणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे का आहे? | What is Pension Payment Order (PPO) number?

मित्रांनो ईपीएफओ (EPFO) सदस्य हे त्यांच्या पगारातील ठराविक रक्कम दर महिन्याला ईपीएफ फंडात (EPF Fund) जमा करतात. यामध्ये कर्मचाऱ्याने दिलेल्या रकमेचा काही भाग पेन्शनमध्ये जातो. जेव्हा एखादा EPF धारक EPF फंडात 10 वर्षे सतत योगदान देतो तेव्हा तो पेन्शन मिळवण्याचा हक्कदार बनतो. त्यांना ही पेन्शन सेवानिवृत्तीनंतर मिळते.

पेन्शन घेणाऱ्या धारकाला पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजेच पीपीओ क्रमांक मिळतो. हा क्रमांक 12 अंकी असतो. पेन्शनधारकासाठी हा नंबर खूप महत्त्वाचा आहे. चुकून हा नंबर गेला तर आपली अनेक कामे अडकू शकतात. चला तर जाणून घेऊया यांबद्दल संपुर्ण माहिती.

पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे काय? EPFO कडून पेन्शन घेणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे का आहे? |What is Pension Payment Order (PPO) number?

पीपीओ क्रमांक का महत्त्वाचा आहे?

मित्रांनो तुम्हाला तुमचे पीएफ खाते दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करायचे असल्यास पीपीओ क्रमांक आवश्यक आहे. खाते ट्रान्सफर दरम्यान पासबुकमध्ये हा क्रमांक न दिल्यास प्रोब्लेम येऊ शकतो.
याशिवाय तुम्हाला पेन्शनशी संबंधित कोणतीही तक्रार करायची असेल तर पीपीओ क्रमांकही आवश्यक आहे.
पेन्शन ऑनलाइन ट्रॅक करण्यासाठी किंवा पेन्शन स्थिती तपासण्यासाठी पीपीओ क्रमांक आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा:- UAN नंबर विसरलात किंवा माहित नाही? मग घर बसल्या जाणून घेऊया शकता

तुमचा पीपीओ क्रमांक हरवला तर काय करावे?

मित्रांनो चुकून पीपीओ नंबर हरवल्यास किंवा विसरल्यास काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही या नंबरवर पुन्हा दावा करू शकता. PPO नंबर पुन्हा कसा मिळवायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

  • तुम्हाला सगळ्यात पहिले EPFO पोर्टलवर (www.epfindia.gov.in) जावे लागेल.
  • यानंतर, तुम्हाला होम पेजवरील ऑनलाइन सेवेवर जाऊन ‘पेन्शनर्स पोर्टल’ निवडावे लागेल.
  • आता ‘Know Your Pension Status‘ वर क्लिक करा.
  • यानंतर, R डॅशबोर्डवरील ‘Knows your PPO No’ वर क्लिक करा ते सेलेक्ट करणे आवश्यक आहे.
  • आता ईपीएफशी लिंक केलेले बँक खाते किंवा पीएफ खाते क्रमांक टाकल्यानंतर ते सबमिट करावे लागेल.
  • सबमिशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीपीओ क्रमांक मिळून जाईल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.