Gold मध्ये गुंतवणूक करायची आहे? मग investment करण्याच्या आधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या | Advantages and disadvantages of investing in gold

मित्रांनो investment म्हणून अनेकजण सोन्यात गुंतवणूक करतात. सरकारने चालु केलेल्या सुवर्ण बचत योजनेमुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे. प्रत्येकाने सोन्यात (Gold Investment Tips) गुंतवणूक करावी, असा सल्लाही आर्थिक तज्ज्ञ नेहमी देत असतात.

पण मित्रांनो सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. मित्रांनो तुम्ही देखील सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे माहित असणे आवश्यक आहे.

Gold मध्ये गुंतवणूक करायची आहे? मग investment करण्याच्या आधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या |Advantages and disadvantages of investing in gold

सोन्यात गुंतवणुकीचे फायदे काय आहेत?

  • आज फिजिकल सोन्यासोबत (दागिने, नाणी) आपण डिजिटल सोन्यातही गुंतवणूक करू शकतो. या दोन्हीमध्ये आपल्याला खूप चांगला परतावा मिळतो.
  • कोणतीही आपत्कालीन परिस्थिती ही सागून येत नाही. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे खूप उपयुक्त ठरते. तुम्ही डिजिटल सोन्यात (Digital gold) गुंतवणूक केल्यास तुम्हाला 2.50 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.
  • डिजिटल सोन्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सार्वभौम गोल्ड बाँड योजना (Soverign Gold Bond) सुरू केली आहे. डिजिटल गोल्डमध्येही कर सवलती उपलब्ध आहेत.
  • फिजिकल सोन्यात गुंतवणूक करताना सुरक्षिततेची समस्या आहे, परंतु डिजिटल सोन्यात ही समस्या उद्भवत नाही. डिजिटल सोने हे पेपर किंवा डीमॅट स्वरूपात उपलब्ध आहे. आपण ते त्वरित ऑनलाइन खरेदी करू शकता आणि त्याची विक्री करणे देखील एकदम सोपे आहे.

हे सुध्दा वाचा:- तुम्हीही गुंतवणूक सुरू करत असाल तर आधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

सोन्यात गुंतवणुक करण्याचे तोटे काय आहेत?

  • सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम लागते. अशा परिस्थितीत अनेक वेळा गुंतवणूकदाराकडे तेवढे पैसे नसतात. पण फिजिकल सोन्यापेक्षा डिजिटल सोने स्वस्त आहे.
  • आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, डिजीटल सोने फक्त मुदतपूर्तीनंतर किंवा 5 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर काढता येते.
  • सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यास गुंतवणूकदारांचेच नुकसान होते.
  • जर गुंतवणूकदाराने फिजिकल सोन्यात गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला सुरक्षिततेच्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. फिजिकल सोने चोरीला जाण्याचा किंवा हरवण्याचा धोका असतो.

महत्वाची सूचना: मित्रांनो हा माहितीपूर्ण लेख आहे आणि गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमचे स्वतःचे संशोधन करा आणि यासाठी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.