तुम्ही पण अपेक्षेपेक्षा जास्त तर क्रेडिट कार्ड युज करता का? करत असाल तर काही खर नाही | How does credit card usage affect credit score

मित्रांनो जेव्हा पण आपण कर्ज घेतो तेव्हा आपल्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, कर्ज देण्यापूर्वी बँक सर्वप्रथम पाहते ते म्हणजे आपला क्रेडिट स्कोअर. क्रेडिट स्कोअर खराब असल्यास कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते.

आपला क्रेडिट स्कोअर खराब होण्याची कोणती कारणे (How does credit card usage affect credit score) आहेत आणि तो चांगला ठेवण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.

तुम्ही पण अपेक्षेपेक्षा जास्त तर क्रेडिट कार्ड युज करता का? करत असाल तर काही खर नाही | How does credit card usage affect credit score

क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरणे

मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे क्रेडिट कार्डवर खर्च केलेले पैसे खरे तर कर्ज असते आणि तुम्ही ते शक्य तितक्या लवकर परत केले पाहिजे, तेव्हा तुमच्या क्रेडिट स्कोअरसाठी चांगले राहिलं. कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरता की नाही, हे पाहण्यासाठी वित्तीय संस्था तुमच्या रेकॉर्डची पूर्ण तपासणी करतात. यामध्ये 30 दिवसांच्या विलंबामुळे क्रेडिट स्कोअर 17 ते 37 अंकांनी घसरू शकतो.

क्रेडिट कार्डने मोठी खरेदी करू नका

सोबत क्रेडीट कार्ड आल्याने आपण बेधडकपणे खरेदी करतो. परंतु, हे वित्तीय संस्थांना अशे दाखवते की आपले क्रेडिट युटिलायझेशन रेशो जास्त आहे. म्हणजेच कर्जावरील आमचे अवलंबित्व जास्त आहे. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डमध्ये उपलब्ध मर्यादेच्या जास्तीत जास्त 30 टक्के वापरावे. शक्यतो क्रेडिट कार्डने मोठी खरेदी करणे टाळा.

हे सुध्दा वाचा: Joint Home loan घेण्याचे काय फायदे आहेत? आणि कोणासोबत हे लोन घेऊ शकता

क्रेडिट कार्डद्वारे कर्ज भरू नका

क्रेडिट कार्डद्वारे कर्ज भरणे म्हणजे कर्ज घेऊन कर्जाची परतफेड करणे. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरला अनावश्यकपणे नुकसान होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ही चांगली गोष्ट असू शकते. तुमचा क्रेडिट स्कोअरही थोडा वाढू शकतो. परंतु, क्रेडिट कार्डद्वारे एकूण कर्ज भरणे ही चांगली गोष्ट नाही.

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणे

  • एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्यात काही अर्थ नाही. हे त्यांचे व्यवस्थापन करण्याची बाब आहे आणि काहीवेळा तुम्ही वेळेवर बिले चुकवू शकता. वार्षिक शुल्कासारख्या खर्चाचा त्रास वेगळा राहील. यामुळे खर्च करण्याची सवय लागते.
  • तुम्ही जुने क्रेडिट कार्ड बंद करून नवीन कार्डसाठी अर्ज करत असलात तरीही, 3 महिन्यांचे अंतर ठेवा. तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असल्यास, तुम्ही प्रतीक्षा 3 महिन्यांपेक्षा जास्त वाढवू शकता.

क्रेडिट कार्ड बंद करताना काळजी घ्या

अनेकदा लोकांकडे दोन क्रेडिट कार्ड असतात, ते अचानक एक बंद करतात. पण, ही पद्धत चुकीची आहे. हे तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढवू शकते. जे आधी दोन कार्डांमध्ये विभागले गेले होते. पण, एक कार्ड बंद केल्याने संपूर्ण भार दुसऱ्या कार्डावर पडेल. यामुळे क्रेडिट स्कोअरही खराब होतो.

अशा परिस्थितीत, तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी, कार्ड जारीकर्त्याशी बोला आणि ते वार्षिक शुल्क नसलेल्या कार्डमध्ये डाउनग्रेड केले जाऊ शकते का ते पाहा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.