Joint Home loan घेण्याचे काय फायदे आहेत? आणि कोणासोबत हे लोन घेऊ शकता | Joint home loan benefits in marathi

मित्रांनो स्वतःच एक घर असावं असं प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, अनेक लोकांसाठी एकाच वेळी एवढी मोठी रक्कम जमा करून घर खरेदी करणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत लोक घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी गृहकर्जाची मदत घेतात.

तुम्हाला गृहकर्ज घेताना काही अडचण येत असेल, तर तुम्ही संयुक्त गृहकर्ज (Joint home loan) घेऊ शकता. हे सामान्य गृहकर्जापेक्षा सहज उपलब्ध आहे आणि कर्जाची रक्कमही जास्त आहे. मित्रांनो जॉईंट होम लोन कसे घेतले जाऊ शकते आणि त्यात कोणते फायदे काय ( Joint home loan benefits in marathi) आहेत ते जाणून घेऊया.

Joint Home loan घेण्याचे काय फायदे आहेत? आणि कोणासोबत हे लोन घेऊ शकता | Joint home loan benefits in marathi

आपण कोणाबरोबर जॉईंट होम लोन घेऊ शकतो?

जॉईंट होम लोनमध्ये कोणतेही विशेष निर्बंध नाहीत. तुम्ही ते कोणासोबतही घेऊ शकता. परंतु, महिला संयुक्त अर्जदार असल्याने अनेक भिन्न फायदे मिळतात. जर तुम्ही एक स्त्री असाल, तर तुम्ही तुमच्या पतीसोबत जॉईंट घर घेऊ शकता. त्याच वेळी, पुरुष देखील त्यांच्या पत्नी किंवा बहिणी सोबत( ती विवाहित नसल्यास) अर्जदार बनवू शकता. जर तुमची पत्नी सुध्दा बिजनेस करत असेल तर तिला सह-मालक बनवल्याने गृहकर्जाचे फायदे अनेक प्रकारे घेता येतात.

जॉईंट होम लोन घेण्याची काय फायदे आहेत?

अधिक कर्ज मिळण्याची शक्यता (Higher Loan Amount)

तुमची आणि तुमच्या सह-अर्जदाराची मिळून वार्षिक उत्पन्न लक्षात घेऊन बँका कर्ज मंजूर करतात. त्यामुळे, एकट्याने अर्ज करण्यापेक्षा संयुक्त अर्जदारा असल्यास तुम्हाला अधिक कर्ज मिळू शकते ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करु शकता.

कमी व्याज दर (Lower Interest Rates)

काही बँका महिला सह-अर्जदार असलेल्या संयुक्त गृहकर्जावर कमी व्याज दर देतात. यामुळे कर्जावरील एकूण व्याज खर्च कमी होतो.

कर सूट (Tax Benefits)

तुम्ही आणि तुमचा सह-अर्जदार दोघेही गृहकर्जावरील मूलभूत रक्कम आणि व्याजावरील कर सूट मिळवू शकता. यामुळे तुमचा करभार कमी होतो आणि कर बचत होते.

हे सुध्दा वाचा:तुम्ही पण गृहकर्ज घेण्याची तयारी करत असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

कर्ज मंजुरीसाठी अधिक पात्रता (Higher Eligibility for Loan Approval)

तुमचा आणि तुमच्या सह-अर्जदाराचा मिळून सिबिल स्कोअर चांगला असल्यास, बँकेला कर्ज मंजूर करण्यास मदत होते. त्यामुळे कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

ईएमआय भरण्याची विभागणी (Shared EMI Burden)

जॉईंट होम लोन तुमच्यावर आणि तुमच्या सह-अर्जदारावर ईएमआय भरण्याची जबाबदारी विभाजित होते. त्यामुळे तुमचा आर्थिक भार कमी होतो.

म्हणून मित्रांनो, Joint Home loan घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक स्थिती आणि गरजेनुसार फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात घेणे आवश्यक आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.