PF खात्याची माहिती किती वेळा बदलता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती | How many times pf account correction online in marathi

मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी, सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजना चालवते. यामध्ये दर महिन्याला कर्मचारी आणि कंपनी समान रक्कम जमा करतात. या रकमेवर सरकार हे दरवर्षी व्याज देते. गरज पडल्यास कर्मचारी त्यांच्या पीएफमध्ये जमा केलेली रक्कमही काढू शकतात.

अनेक वेळा पीएफ खात्यात चुकीची माहिती जसे की नावाचे स्पेलिंग, जन्मतारीख किंवा इतर माहिती चुकीची असल्यास, पीएफमधून पैसे काढण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत त्यात बदल करता येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही तुमच्या पीएफ खात्यामध्ये किती वेळा तुमची माहिती अपडेट (How many times pf account correction online in marathi) करू शकता.

PF खात्याची माहिती किती वेळा बदलता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती | How many times pf account correction online in marathi

पीएफ खाते किती वेळा अपडेट केले जाऊ शकते?

मित्रांनो कर्मचारी त्याच्या पीएफ खात्यातील माहिती ही 11 वेळेस अपडेट करू शकतो( नोकरी चालू असेपर्यंत). आता आपण जाणून जाणून घेऊया की, कोणती माहिती किती वेळा बदलू शकतो.

पीएफ खात्याची माहिती अपडेट करण्यासाठी जारी केलेल्या नवीनतम एसओपीनुसार, एक कर्मचारी सिंगल किंवा जॉईंट डिक्लेरेशनसाठी एका दिवसात 5 बदल करू शकतो. जर 5 पेक्षा जास्त बदल केले असतील तर त्याची OIC द्वारे तपासणी केली जाते. मातृ स्थिती वगळता सर्व माहिती फक्त एकदाच अपडेट केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, काळजीपूर्वक भरा.

हे सुध्दा वाचा:- उपचार, लग्न किंवा घर बांधण्यासाठी पीएफमधून पैसे काढायचे आहेत, मग जाणून घ्या लिमिट किती आहे?

ईपीएफ खात्यात बदल कसे करावे? |How to modify pf account correction online

  • स्टेप 1: तुम्हाला यूएएन/पासवर्डसह ईपीएफ खात्यात लॉग इन करावे लागेल.
  • स्टेप 2: येथे तुम्हाला मॅनेज ऑप्शनवर जाऊन मॉडिफाय बेसिक डिटेल्स वर क्लिक करावे लागेल.
  • स्टेप 3: आता तुम्हाला जी काही माहिती अपडेट करायची आहे ती अपडेट करा. लक्षात ठेवा की तुम्ही जी काही माहिती अपडेट करणार आहात म्हणजेच जी आधार कार्ड वर माहिती आहे तीच तुम्ही त्या ठिकाणी टाकावं, कारण याची पडताळणी सुद्धा होते.
  • स्टेप 4: यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.