LIC पॉलिसीवर पण मिळत personal loan, जाणून घ्या संपूर्ण माहिती | How to apply for loan against lic policy

मित्रांनो आपल्यावर एखादी Emergency आली किंवा आपल्याला लग्नासाठी, घर बांधण्यासाठी किंवा दवाखान्यासाठी पैशाची गरज असते तेव्हा आपण बँकेत लोनसाठी apply करतो. पण काही कारणामुळे किंवा सिविल खराब असल्यामुळे ते लोन होत नाही. पण जर तुमच्याकडे एखादी एलआयसी पॉलिसी असेल तर तुम्ही लगेच त्या पॉलिसीवर लोन घेऊ शकता. हो मित्रांनो ही खरी गोष्ट आहे, लोन घेऊ शकता ते पण lic policy वर. आज आपण विमा पॉलिसीच्या कर्जासाठी किती व्याज लागते आणि त्याचे नियम काय आहेत याच गोष्टीबद्दल सविस्तरपणे (how to apply for loan against lic policy information in marathi) जाणून घेणार आहोत.

LIC पॉलिसीवर पण मिळत personal loan, जाणून घ्या संपूर्ण माहिती |How to apply for loan against lic policy

या पॉलिसीसाठी नियम काय आहेत?

  • तुम्हाला हे कर्ज फक्त तुम्हाला ट्रॅडिशनल आणि एंडॉवमेंट पॉलिसी अंतर्गत मिळते.
  • कर्जाची रक्कम एलआयसी पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूनुसार (surrender value) ठरवली जाते. पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या 80 ते 90 टक्के इतकेच कर्ज मिळते.
  • पॉलिसीवर उपलब्ध असलेल्या कर्जावरील व्याजदर हे 10 ते 12 टक्के असला तरी काही वेळा तो पॉलिसीधारकाच्या प्रोफाइलवरही अवलंबून असतो.
  • जेव्हा जेव्हा पॉलिसीधारक हा policy वर कर्ज घेतो तेव्हा कंपनी त्याची पॉलिसी गहाण ठेवते.
  • कर्जाची परतफेड होण्यापूर्वी पॉलिसी मॅच्युरिटी झाल्यास, कंपनी कर्जाची रक्कम कापून घेते.

हे सुध्दा वाचा:- अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार दरमहा 5000 रुपये पेन्शन, योजनेचे काय फायदे आहेत?

या पॉलिसीसाठी अर्ज कसा करायचा?

  • जर तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असेल तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. ऑफलाइनसाठी तुम्हाला एलआयसी कार्यालयात जावे लागेल. ऑफलाइन कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला KYC कागदपत्रे सोबत न्यावी लागतील.
  • ऑनलाइनसाठी तुम्हाला एलआयसी ई-सेवामध्ये स्वतःची नोंदणी करावी लागेल. यानंतर, तुमच्या खात्यात लॉग इन केल्यानंतर, तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.
  • पॉलिसीवर कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही त्याबद्दल एलआयसी एजंटला (Lic agent) विचारू शकता. काळजीपूर्वक वाचल्यानंतरच, अर्ज सबमिट करा आणि ऑनलाइन केवायसी डॉक्युमेंट (KYC document) अपलोड करा. अशा प्रकारे तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची आहे तर नक्की शेअर करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.