तुमच्या नावावर दुसऱ्यांनी तर कर्ज घेतले नाही ना? अस चेक करा |How to Check if You Have a Fake Loan in Your Name?

मित्रांनो 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार देशात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. आता सायबर गुन्ह्यात लोनचाही समावेश करण्यात आला आहे. कारण सायबर क्राईम मध्ये असं दिसून आला आहे की एकाच व्यक्तीच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीचे कर्ज चालू आहे. असा फसवणुकीच्या घटना खूप वाढत चालले आहेत. आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या नावावर कोणी लोन घेतलं असेल, तर ते कसं चेक करायचं.

तुमच्या नावावर दुसऱ्यांनी तर कर्ज घेतले नाही ना? अस चेक करा |How to Check if You Have a Fake Loan in Your Name?

बनावट कर्ज

सायबर गुन्हेगार हे दुसऱ्याच्या नावाने बनावट कर्ज घेतात. कर्जामध्ये घेतलेली रक्कम ज्याच्या नावावर कर्ज घेतले आहे त्या व्यक्तीलाच भरावे लागते. अशा फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. पण तुमच्या नावावर इतर कोणत्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता. एखाद्याने कर्ज घेतले असेल तर त्याची तक्रारही पण तुम्ही करू शकता.

नेहमी सिबिलचा वापर करत जा

तुमच्या नावावर किती loan घेतल आहेत हे तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही ते तुमच्या सिबिल स्कोअरवरून (CIBIL score) तपासू शकता. सिबिल स्कोअरमध्ये तुम्ही तुमची माहिती जाणून घेऊ शकता. तुमच्या नावावर कोणत्याही व्यक्तीने बनावट कर्ज असेल तर तुम्ही त्याची माहिती सिबिल स्कोरवरून सहज मिळते. आता एक प्रश्न पडतो हे सिबिल स्कोर म्हणजे काय? आणि ती माहिती कशी चेक करायची. मित्रांनो ही माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

सिबिल स्कोअर काय आहे? | Whats is CIBIL score in Marathi

जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज घेते तेव्हा त्याचा सिबिल स्कोअर तयार होतो. सिबिल स्कोअर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती काय आहे ती ते दर्शवतो. व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर त्याला loan सहज मिळते. पण जर सिबिल खराब असल्यास त्याला कर्ज मिळण्यात अडचणी येते. तुम्ही वेळेवर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट न केल्यास सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. तुमचा सिबिल खराब असल्यास तुमचा डिफॉल्टरच्या यादीत नाव येत.

असा प्रकारे तपासा सिबिल

देशात अनेक क्रेडिट कंपन्या आहेत जिथे तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट फ्रीमध्ये तपासू शकता. याशिवाय तुम्ही अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुमचा सिबिल स्कोअर सहज पाहु शकता. सिबिल स्कोअर मोफत तपासण्याची सुविधा देखील बँक ॲप्सवर प्रदान करण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा:- बँक ग्राहकांनो कृपया लक्ष द्या! Home आणि personal लोन घेणे आता महाग झाले?

अशाप्रकारे तुम्ही सिबिल स्कोर तपासू शकता

 • सगळ्यात पहिले CIBIL पोर्टलच्या वेबसाइटवर जा www.cibil.com.
 • खाली स्क्रोल केल्यावर आल्यावर Get Your CIBIL Score वर क्लिक करा
 • यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 सबस्क्रिप्शन प्लॅन दिसतील.
 • तुमच्या सोयीनुसार तुम्ही तो प्लॅन निवडू शकतो.
 • तुम्हाला त्या ठिकाणी जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी विचारले जाईल.
 • नंतर लॉग इन करून तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल.
 • यानंतर, तुम्हाला आयडी प्रकारात आयकर आयडी निवडावा लागेल आणि पॅन कार्ड क्रमांक टाकावं लागेल. येथे फक्त पॅन
 • कार्ड नंबर टाकल्यास, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे रेकॉर्ड दिसेल.
 • यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी काही प्रश्न विचारले जातील, ते तुम्ही भरा आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
 • ईमेल किंवा ओटीपीच्या मदतीने तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता.
 • तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल, ज्यामध्ये माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमचा CIBIL स्कोर तपासू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.