मित्रांनो म्हातारपणी उत्पन्न चालू ठेवण्यासाठी पेन्शन खूप महत्त्वाची भूमिका बजावते. रिटायरमेंटनंतरही उत्पन्न मिळवणे सुरू ठेवण्यासाठी, बरेच लोक त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक करण्यास सुरवात करतात. सध्या गुंतवणुकीसाठी अश्या अनेक योजना आहेत. ज्यामध्ये NPS (National Pension System-NPS) ही एक pension योजना आहे.
यामध्ये खातेदाराला परताव्याचा लाभ मिळतो. याशिवाय मुदतपूर्तीनंतर पेन्शनची सुविधाही उपलब्ध आहे. जेव्हा गुंतवणूकदार 60 वर्षांचा होतो तेव्हा तो NPS मध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढू शकतो. त्याच वेळी, 40 टक्के वार्षिकी म्हणून वापरले जातात. अशाप्रकारे NPS मोठ्या निधीसह म्हातारपणी निवृत्ती वेतनाची व्यवस्था होते.
मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की, जर गुंतवणूकदाराने संपूर्ण आर्थिक वर्षात NPS खात्यात किमान रक्कम जमा केली नाही तर त्याचे खाते फ्रीज केले जाते. गुंतवणूकदाराने एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये तरी गुंतवले पाहिजेत. फ्रीझ किंवा इन ऍक्टिव्ह खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते. इन ऍक्टिव्ह खाते पुन्हा कसे सक्रिय करायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
NPS खाते फ्रीज झालं आहे, मग ‘या’ स्टेप्स फॉलो करून तुम्ही account active करा | How to unfreeze nps account offline and online
NPS खाते कसे चालू करावे?
- फ्रीज खाते पुन्हा चालू करण्यासाठी, तुम्हाला UOS-S10-A फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये सहज मिळेल. याशिवाय, तुम्ही ज्या बँकेत तुमचे NPS खाते उघडले आहे तिथूनही हा फॉर्म घेऊ शकता. तुम्ही ऑनलाइन फॉर्म देखील डाउनलोड करू शकता.
- फॉर्म भरल्यानंतर ग्राहकाला PRAN कार्डची झेरॉक्स जोडावी लागेल.
- यासोबतच खातेदाराला वार्षिक थकबाकी जमा करावी लागेल आणि त्याला वार्षिक 100 रुपये दंड भरावा लागेल.
- अर्ज भरल्यानंतर त्याची पडताळणी अधिकाऱ्याकडून केली जाईल.
- अर्जाची पडताळणी झाल्यानंतर, प्रक्रिया सुरू केली जाईल आणि PRAN चालू केले जाईल.
हे सुध्दा वाचा:- तुम्हीही गुंतवणूक सुरू करत असाल तर आधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
फ्रीज झालेले NPS खाते ऑनलाईन कसे चालू करावे?
- तुम्ही NPS वेबसाइटवर जा (https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/nps.aspx).
- आता तुमचा PRAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
- यानंतर My account वर क्लिक करा.
- आता Unfreeze account चा पर्याय निवडा.
- यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल आणि लेट फी भरावी लागेल.
- पेमेंट केल्यानंतर तुमचे खाते चालू केले जाईल.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.