स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे? मग सरकार या योजनेमार्फत तुम्हाला मदत करेल | How to apply for pm mudra loan know eligibility and important documents in marathi

मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. पण अशा परिस्थितीत जर आपल्याला नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर कोणतीच बँक लोन देत नाही, याच गोष्टीवर सोल्युशन म्हणून, सरकार स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना (PM Mudra Yojna) सुरू केली आहे.

या योजनेद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जही घेऊ शकता. या योजनेंतर्गत उपलब्ध कर्जाचा व्याजदर बँकांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सुलभ हप्त्यांमध्ये कर्ज दिले जाते. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

आज आपण या पोस्टमधे How to apply for pm mudra loan know eligibility and important documents in marathi बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे? मग सरकार या योजनेमार्फत तुम्हाला मदत करेल | How to apply for pm mudra loan know eligibility and important documents in marathi

अर्ज कसा करायचा?

  • तुम्हाला पीएम मुद्रा कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • यामध्ये तुम्हाला मुद्रा लोनचा पर्याय निवडावा लागेल.
  • आता apply वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला नोंदणीवर जाऊन सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल आणि OTP जनरेट करावा लागेल.
  • ओटीपी जनरेट केल्यानंतर, तुम्हाला कर्जासाठी अर्ज केंद्र निवडावे लागेल.
  • यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • आता तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल.
  • तुम्ही अर्ज क्रमांकाद्वारे स्थिती सहज तपासू शकता.

महत्वपूर्ण कागदपत्र कोणती आहेत? (Important Documents)

मित्रांनो मुद्रा लोन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतील:

व्यक्तिगत ओळख कागदपत्र (Identity Proof)

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (PAN Card)
  • मतदान ओळखपत्र (Voter ID Card)
  • पासपोर्ट (Passport) इत्यादी.
  • ॲड्रेस पुरावा (Address Proof)
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • मतदान ओळखपत्र (Voter ID Card)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
  • लाईट बिल (Electricity Bill)
  • मालमत्ता कर रसीद (Property Tax Receipt)

व्यक्तिगत ओळख कागदपत्र (Identity Proof)

  • व्यवसायाचा पुरावा (Business Proof):
  • व्यापार प्रमाणपत्र (Business Certificate)
  • उद्योग आधार नोंदणी (Udyam Aadhar Registration)
  • GST रजिस्ट्रेशन (GST Registration)
  • व्यापार परवाना (Trade License)
  • बँक स्टेटमेंट (Bank Statements)

हे सुध्दा वाचा:- 16व्या हप्त्याचे पैसे अजून तुमच्या खात्यात आले नाहीत? जाणून घ्या काय कारण आहे

योजनेची पात्रता काय आहे?

  • या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकच घेऊ शकतात.
  • जर एखादी व्यक्ती बँक किंवा वित्तीय संस्थेची डिफॉल्टर असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही एजंटची आवश्यकता नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे सुध्दा वाचा:- तुम्ही पण गृहकर्ज घेण्याची तयारी करत असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

अधिक माहितीसाठी (For More Information)

  • मुद्रा योजना: https://www.mudra.org.in/
  • हेल्पलाइन क्रमांक: 1800-128-4455

Note: कर्ज आणि त्याच्या अटींबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळील कोणत्याही pm mudra loan देणाऱ्या बँकेशी संपर्क साधू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.